पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न


अलिबाग,दि.27 (जिमाका):- आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना तसेच इतर विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे व विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज