पुणे जिल्ह्यातील धरणांच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग इंद्रायणी नदीत सोडण्यात येतो; रायगड जिल्ह्यात नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये


अलिबाग, दि.14 (जिमाका):- सध्या विविध समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे यामध्ये टाटा पॉवर कंपनीच्या पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या विसर्गाबाबत ज्या सूचना प्रसारित करण्यात येत आहेत, त्या बातम्या पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी परिसरातील नागरिकांकरिता लागू आहेत.

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येतो. रायगड जिल्ह्यात या धरणांच्या सांडव्यावरून कोणत्याही स्वरूपात विसर्ग सोडण्यात येत नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी (विशेषतः खोपोली/कर्जत/खालापूर भागातील) अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी पारित केल्या जाणाऱ्या सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेऊन त्यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत