जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित “राष्ट्रीय एकता दौड”ला उस्फूर्त प्रतिसाद

 

अलिबाग, दि.31 (जिमाका):- देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली.

यावेळी तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.सुहास व्हनमाने, क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, यतीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या एकता दौडचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला. यावेळी जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग, पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यासह विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी व कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज