फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता शाळा-महाविद्यालयांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी

 

अलिबाग, दि.07 (जिमाका):- आयुक्त, शिक्षण व क्रीडा यांनी दिलेल्या निर्देशानुसार फिट इंडिया प्रश्नमंजुषा 2022 या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

या स्पर्धेकरिता नोंदणी करण्याची मुदत दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी http://fitindia.nta.ac.in या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी.

तरी फिट इंडिया प्रश्नमंजुषा 2022 या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेसंबंधी अधिक माहितीकरिता http://fitindia.nta.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज