अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत

 

अलिबाग, दि.25 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरविण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत रु.3 लक्ष 50 हजार एवढे अनुदान मंजूर करण्यात येत असून त्यापैकी 90% हिस्सा शासनाचा असतो व उर्वरित 10% हिस्सा हा बचतगटांचा आहे. इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचतगटातील सदस्यांनी या योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

बचतगटांनी 10% रक्कम भरल्यानंतर रु.3 लाख 15 हजार ही रक्कम बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. स्वयंसहाय्यता बचतगटांना किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा (रु.3.15 लाख) जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त जादाची रक्कम बचतगटांना स्वतः खर्च करावी लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचतगटातील सदस्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छीभवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, श्रीबाग रोड अलिबाग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज