शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दि.5 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन

 


 

अलिबाग,दि.20(जिमाका):- शिक्षण विभाग, माध्यमिक यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर  अधिकारी-कर्मचारी हे सन-2022-2023 मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यानुषंगाने प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि.5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, चौथा मजला, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग येथे  जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

तरी जिल्ह्यातील प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीसाठी दि.5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, चौथा मजला, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद ज्योत्सना शिंदे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत