राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम संपन्न

 



 

अलिबाग,दि.27 (जिमाका :- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ग्राहकांचे अधिकार व ग्राहक संरक्षण अधिनियम-2019 याविषयावर (शनिवार, दि.24 डिसेंबर 2022) रोजी जिल्हा पुरवठा विभाग तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड- अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने पथनाट्यातून जागो ग्राहक, जागो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी कार्यक्रमास प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी  ज्ञानदेव यादव, नायब तहसिलदार मानसी पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या  अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, अव्वल कारकून विनायक सर्णेकर, नयन नाईक, हेमंत पाटील, दीपक मुळे, दिलीप शहापूरकर, महसूल सहाय्यक प्रेरणा पाटील, अनेश पाटील, गणेश पाटील, विजय नाईक आदि उपस्थित होते.

या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर व अलिबाग बस स्थानक येथे जनजागृती केली. पथनाट्यात प्रतिक कोळी, विराज म्हात्रे, साक्षी पाटील, नेहा म्हात्रे, सार्थक गायकवाड, वैष्णवी नागे आदी कलाकार सहभागी झाले होते. 

या कार्यक्रमाचे नियोजन कवी लेखक तथा अव्वल कारकून विनायक सर्णेकर यांनी केले होते. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत