सुप्रिया जेधे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान होणार “सावित्रीची लेक” पुरस्कार

 


 

अलिबाग,दि.09(जिमाका):- दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे सौ.सुप्रिया जेधे यांना जनकल्याण सेवा संस्था यांच्याकडून "सावित्रीची लेक "पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दि. 3 जानेवारी 2023 रोजी दिला जाणार आहे.  श्रीमती जेधे यांना त्या सामाजिक कार्यात देत असलेल्या योगदानासाठी सन्मानित केले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले समाजभूषण पुरस्कार ग्लोबल गोल्ड स्टार अवॉर्ड 2022 साठीही त्यांची निवड झाली आहे.  

सौ.सुप्रिया जेधे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सुरभी स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  संविधान जनजागृती, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, राष्ट्रीय एकात्मता, फटाके विरोधी अभियान, समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम, गणपती दान व इको फ्रेंडली गणपती, त्यासाठी  कृत्रिम तलावाची निर्मिती, वनराई बंधारे,  अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण इत्यादी सामाजिक उपक्रम तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत केलेले कार्य, वृक्षारोपण व पाणलोट विकास या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज