कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावते--प्रकल्प अधिकारी श्रीम.शशिकला अहिरराव


 

अलिबाग,दि.06(जिमाका) :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दांपत्याकरिता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व नामांकित स्वयंसेवी संस्थाकडून कन्यादान योजनेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्याने योग्य त्या कागदपत्रासह 07 डिसेंबर 2022 पासून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना रु.10 हजार इतके अनुदान देय आहे.  तसेच लग्न सोहळा आयोजित करण्यासाठी सेवाभावी संस्था तयार असल्यास कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रु.10 हजार इतके अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी-विहित नमुन्यातील कन्यादान योजनेचा अर्ज, दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला, जातीचे दाखले, वयाबाबतचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला,  विवाह न झाल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रु. 100 च्या स्टॅम्पवर नमूद करावे.  लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड या कार्यालयातील कन्यादान योजना कक्षाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

कन्यादान योजनेचा लाभ जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी घ्यावा व या योजनेकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण श्रीम.शशिकला अहिरराव यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज