सब नॅशनल सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांची तळवले गावाला भेट

 


 

  अलिबाग,दि.22 (जिमाका) :- जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण किती प्रमाणात वाढले आहे, किंवा कमी झाले आहे, यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) व इंडियन मेडिकल रिसर्च कोन्सिल (ICMR) या जागतिक स्तरावरच्या संस्था सर्वेक्षण करीत असून त्यासाठी रायगड जिल्ह्याचे नामांकन झाले आहे.

त्यानुंषगाने हे सर्वेक्षण दर्जेदार व दिलेल्या नियमानुसार होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी (दि.20 डिसेंबर 2022) रोजी अलिबाग तालुक्यातील तळवले गावाला भेट देऊन तेथील सर्वेक्षणाची माहिती घेतली. तसेच तेथील नागरिकांना सर्वेक्षणाविषयी माहिती देवून त्यांच्याशी चर्चा केली. या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि आरोग्य विभागाकडून होत असलेल्या सर्वेक्षणा दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची माहिती स्वयंसेवकांना देवून या सर्वेक्षण कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी तेथील नागरिकांना यावेळी केले.

यावेळी पेंढाबे प्राथमिक आरोग्य केंद्राचें डॉ.अनुप्रिया खटावकर, विज्ञान एम.पी.डब्लू श्री.मोकल, जिल्हा आरोग्य सहाय्यक श्री.जयवंत विशे, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक श्री.किर्तीकांत पाटील, श्रीमती अनिता कनोज, आशा वर्कर श्रीमती मनाली ठाकूर, स्वयंसेवक कु.मनाली देशमुख व श्री.प्रकल्प वाणी हे उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज