शालेय विद्यार्थ्यांसाठी “सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन” विषयावर आरसीएफ विद्यालय येथे कार्यशाळा संपन्न

 


 

                 अलिबाग,दि.23 (जिमाका) :- वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यात वन्यजीव विशेषत: साप, पक्षी, सस्तन प्राणी यांचा बचाव तसेच औषधोपचर करण्याचे सेवाभावी कार्य करीत आहे. रायगड वनविभागाच्या सहकार्याने वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग या संस्‍थेतर्फे (शनिवार, दि. 17 डिसेंबर 2022) रोजी आरसीएफ विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत डॉ.प्रसाद दाभोळकर, ओमकार कामतेकर, अदिती सगर, सुजित लाड आणि समीर पालकर यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सापांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.   परिसरात साप आढळून आल्यास त्याला मारु नये, काय करावे तसेच सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज