ई-चावडी, ई-फेरफार व ई-हक्क प्रणालीबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न ई-चावडी प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार



 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- ई-चावडी प्रकल्पांतर्गत ई-चावडी प्रणाली विकसनाचे कामकाज असून अष्टसूत्री कामकाज पूर्ण असणाऱ्या गावांचा समावेश ई-चावडी प्रकल्पात करता येणार आहे. जिल्ह्यात प्रथम भाग अद्ययावतीकरण पूर्ण असणारी गावे निश्चित करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प कार्यान्वित करता येईल. या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार बुधवार, दि.14 डिसेंबर 2022 रोजी रिलायन्स टाऊनशिप नागोठणे येथे ई-चावडी, ई-फेरफार व ई-हक्क प्रणाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले.

   यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे श्रीमती सरिता नरके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी तथा DDE, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व नायब तहसिलदार (ई फेरफार), व प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कामकाज करणारे प्रत्येकी 2 तलाठी व 2 मंडळ अधिकारी आदि उपस्थित होते.

     या बैठकीत ई-फेरफार व नव्याने विकसित ई-हक्क आज्ञावलीबाबत प्रशिक्षण व चर्चा  झाली. या बैठकीसाठी प्रातांधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन केले.  या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज