महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन VSTF च्या मार्गदर्शनपर मुरूड येथील चोरढे शाळेला भेट स्वरूपात दिला लॅपटॉप

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- महाराष्ट्र  ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन VSTF आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत निवडलेली मुरूड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे या शाळेला गावातील पालकवर्ग व शिक्षकगण यांच्याकडून रुपये 37500/- किंमतीचा एक लॅपटॉप भेट म्हणून प्रदान करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालकवर्ग व शिक्षकगण यांना अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव  यांनीही  शाळेला भेट दिली.

तसेच मार्गदर्शनपर लोकसहभाग, श्रमदान व पालकांची जबाबदारी समजवून सांगण्यात आली की, जेव्हा VSTF तर्फे रु.3 लाख शाळेला दिले जातात तर पालकांचेही शाळेप्रति काही कर्तव्य बनतात, शाळेकडे लक्ष देणे, यातूनच चक्रीवादळात शाळेचे झालेले नुकसान त्यामुळे शाळेला आवश्यक असलेली बाब होती म्हणजेच लॅपटॉप. आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनकडून शाळेला देण्यात आलेला लॅपटॉप हे अभियानाचे यशच म्हणता येईल, असे मत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये यांनी व्यक्त केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज