“रस्ता सुरक्षा अभियान- 2023” “सडक सुरक्षा,जीवन रक्षा...” रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व अलिबाग राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने “रस्ता सुरक्षा अभियान- 2023” चा उद्घाटन संपन्न

 


     अलिबाग,दि.11(जिमाका) :- रस्ता सुरक्षा अभियान-2023 चा उदघाटन कार्यक्रम रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व अलिबाग राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग राज्य परिवहन आगार येथे संपन्न झाला.

   यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा,अलिबाग श्रीमती सूवर्णा पत्की, राज्य परिवहन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक पंकज ढावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे, उपप्रादेशिक विभागाचे, मेहुल पाटील, राज्य परिवहन मंडळाचे इतर अधिकारी-कर्मचारी, चालक,वाहक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून रस्ता सुरक्षा अभियान, वाहतुकीचे नियम,  वाहतूक सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी, मानसिक व  शारिरीक आरोग्य  आदि विषयांबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले. 

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनाअपघात सलग 15 वर्षे सुरक्षित सेवा बजावलेल्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.  यावेळी जेएसएम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सडक सुरक्षा,जीवन रक्षा... या विषयावरील अतिशय उत्कृष्ट पथनाट्य सादर केले.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज