जिल्ह्यात निवडणूक कालावधीत मतदानाच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर

 

 

अलिबाग,दि.11(जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र विधानपरिषदव्दारे कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि.30 जानेवारी 2023  रोजी मतदान होणार आहे.

या निवडणूका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये तरतूद आहे.

त्याचप्रमाणे Handbook for Returning Officer for Elections to the Council of states and State Legislative Councils, February,२०१६,Document 4,Edition I, Chapter X मधील सूचनांच्या अनुषंगाने मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात निवडणूक कालावधीत मतदानाच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज