जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

 

 

अलिबाग,दि.12(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.

188- पनवेल विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 2 लाख 90 हजार 260, स्त्री मतदार संख्या 2 लाख 49 हजार 878,  तृतीयपंथी-32, एकूण मतदार संख्या 5 लाख 40  हजार 170.

189- कर्जत विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 50 हजार 492, स्त्री मतदार संख्या 1 लाख 47 हजार 213,  तृतीयपंथी -1, एकूण मतदार संख्या 2 लाख 97  हजार 706.

190- उरण विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 51 हजार 49, स्त्री मतदार संख्या 1 लाख 48 हजार 452,  तृतीयपंथी -7, एकूण मतदार संख्या 2 लाख 99  हजार 508.

191- पेण विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 53 हजार 111, स्त्री मतदार संख्या 1 लाख 48 हजार 748,  तृतीयपंथी -2, एकूण मतदार संख्या 3 लाख 1  हजार 861.

192- अलिबाग विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 44 हजार 654, स्त्री मतदार संख्या 1 लाख 46 हजार 329,  तृतीयपंथी -0, एकूण मतदार संख्या 2 लाख 90  हजार 983.

193- श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 29 हजार 505, स्त्री मतदार संख्या 1 लाख 33 हजार 982,  तृतीयपंथी -1, एकूण मतदार संख्या 2 लाख 63  हजार 488.

194- महाड विधानसभा मतदारसंघ –पुरुष मतदार संख्या 1 लाख 41 हजार 448, स्त्री मतदार संख्या 1 लाख 40 हजार 865,  तृतीयपंथी -2, एकूण मतदार संख्या 2 लाख 82  हजार 315.

अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघातील एकूण पुरुष मतदार संख्या 11 लाख 60 हजार 519, स्त्री मतदार संख्या 11 लाख 15 हजार 467,  तृतीयपंथी -45, एकूण मतदार संख्या 22 लाख 76  हजार 31 इतकी आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज