अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी मिळणार मोफत अन्नधान्य


 

अलिबाग,दि.16(जिमाका):- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना-2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येते. हे अन्नधान्य गहू रु. 2  प्रतिकिलो व तांदूळ  रु.3 प्रतिकिलो या दराने लाभार्थ्यांना देण्यात येते.

             केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हे अन्नधान्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना माहे जानेवारी,2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत वर्षभर मोफत वितरीत करण्यात येणार आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावामुळे केंद्र शासनाकडून एक विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल,2020 पासून डिसेंबर,2022 पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिव्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत होते.

            ही योजना माहे जानेवारी 2023 पासून बंद करण्यात आली असून नियमित योजनेचे अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे.

            या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील जवळपास  4 लाख 50 हजार 736 कुटूंबामधील  17 लाख 64 हजार 145 गोरगरिब जनतेला होणार आहे.   केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरीब जनतेला सध्याच्या महागाईत आर्थिक दिलासा मिळणार आहे

              या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना-2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक