मौजे हनुमान कोळीवाडा गावच्या पुनर्वसन संदर्भात यादीतील टंकलिखित दोष/आक्षेप असल्यास तहसिल कार्यालय,उरण येथे निवेदन सादर करावे--तहसिलदार भाऊसाहेब अंधारे

 

 

अलिबाग,दि.17(जिमाका):- मौजे हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन करण्याकामी जे.एन.पी.ए. प्रशासनाकडून 256 कुटूंबांची अधिकृत यादी मागविण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेखानुसार 86 शेतकरी कुटूंब संख्या असून 170 बिगर शेतकरी कुटूंब आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडील दि.17 फेब्रुवारी 1990 रोजीच्या आज्ञापत्रामध्ये कुटूंबातील व्यक्तींची संख्या 206 एवढी असून 105 कुटूंबांना भूखंड वाटप करण्यात आले आहे.

त्यानंतर सन 1997 च्या दरम्यान हनुमान कोळीवाडा गावाला वाळवी लागत असल्याने तेथील ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी केल्यानंतर मार्च 1997 मध्ये हनुमान कोळीवाडा गावचे कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यावेळी 268 कुटूंबे होती असे तहसिल कार्यालय, उरण  यांच्या अभिलेखावरुन स्पष्ट होत आहे.

त्यामुळे दोन्हीही कागदपत्रे पाहता व पडताळणी करता 256 कुटूंबांची यादी या कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 86 शेतकरी कुटूंबे व 170 बिगर शेतकरी कुटुंबे आहेत.

उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडील दि.17 फेब्रुवारी 1990 रोजीचे आज्ञापत्र व तहसिल कार्यालय उरण यांच्याकडील हनुमान कोळीवाडा येथील मार्च 1997 चे कुटूंब सर्व्हेक्षणानुसार हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी तहसिल कार्यालय उरण यांच्यामार्फत यादी प्रमाणित करण्यात आली आहे. या यादीतील टंकलिखित दोष/आक्षेप असल्यास त्याबाबत पुराव्यासह तहसिल कार्यालय, उरण येथे दि.20 जानेवारी 2023 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत निवेदन सादर करावे, तद्नंतरचे आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज