महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीचे किल्ले रायगडवरून आयोजन

 


 

अलिबाग,दि.02(जिमाका):-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे दि.05 ते दि.13 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने या स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत रॅली रायगड किल्ल्यावरुन करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 या स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मुख्य ज्योतीचे प्रज्वलन दि.04 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता रायगड किल्ल्यावर करण्यात येणार आहे.  ही मुख्य क्रीडा ज्योत निजामपूर–पाटणूस-ताम्हिणी घाट– मुळशी मार्गे  श्री शिवछपत्रती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे नेण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी, रायगड जिल्ह्यातील सर्व क्रीडा पुरस्कारार्थी, महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणारे रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे उपस्थित राहणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व क्रीडा पुरस्कारार्थी, रायगड जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटना, त्यांचे पदाधिकारी, वरिष्ठ खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार बांधवांनी जरुर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत