सेवापुस्तके पडताळणीकरिता विभागीय स्तरावर शिबिराचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.05(जिमाका):- संचालक,संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या परिपत्रकामधील निर्देशानुसार आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे मोठया प्रमाणावर सेवापुस्तके पडताळणी करणे प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरते निवत्ती वेतन प्रदान करण्याची प्रकरणे मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत.

शासन व संचालनालय स्तरावर ही प्रकरणे निकाली काढण्याकरिता व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर सेवापुस्तके पडताळणी करण्याकरिता शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान आपल्या अखत्यारीतील कार्यालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून जास्तीत जास्त सेवापुस्तके वेतन पडताळणीकरिता वेतन पडताळणी पथक, कोकण भवन येथे सादर करावीत.  तसेच वेतन पडताळणी झालेली अशी प्रकरणे महालेखापाल कार्यालयास सादर करण्यात यावीत.

माहे डिसेंबर 2022 च्या वेतन देयकासोबत अशा सर्व तात्पुरती निवृत्तीवेतनधारकांची वेतन पडताळणी पूर्ण झाल्याबाबत कार्यालयप्रमुखाचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे किंवा तात्पुरती निवत्ती वेतन अदा करण्याचे कारण नमूद करावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. रमेश इंगळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज