शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा

 

 

अलिबाग,दि.05 (जिमाका) :- शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे दि.09 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 या मेळाव्यासाठी जेएसडब्ल्यू, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, दिपक फर्टिलायझर्स लिमिटेड या सारख्या नामांकित आस्थापनाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शिकाऊ उमेदवारी करिता निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा विद्यावेतन आणि कंपनीतर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतात. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी, उमेदवारांनी आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेले तसेच बीए, बीकॉम व इतर पदवी/पदविकाधारक उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्याच्या दृष्टीने या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी, आयटीआय पास/ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र या मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतींसह तसेच पासपोर्ट फोटो घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे सकाळी 9 वाजेपर्यंत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. विजय टिकोले व संस्थेच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती विद्या पाटील यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज