उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.16(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्या वतीने दि. 11 ते दि. 17 जानेवारी 2023 या कलावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने (दि. 12 जानेवारी 2023)  रोजी या कार्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.महेश देवकाते यांनी केले. 

तसेच कार्यालयात कामासाठी येणाऱ्या अभ्यगतांना रस्ते अपघात कमी करण्याकरिता प्रबोधनात्मक चित्रफित दाखविण्यात आली. नेत्र तपासणी शिबीरामध्ये वाहन चालक, विविध कामासाठी येणाऱ्या जनतेचे तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दिवसभरात किमान 100 लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यालयाच्या जिते येथील ब्रेक टेस्टींग ट्रॅकवर वाहन तपासणीसाठी येणाऱ्या वाहन चालक, मालक यांचे रस्ते अपघात कमी करण्याकरिता रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन करण्यात आले. या कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शाळा. महाविद्यालये येथे जाऊन रस्ता सुरक्षा विषयक विशेष मार्गदर्शन करण्यात येत असून वाहन चालकामध्ये रस्ता सुरक्षेविषयी व रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्याकरिता सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.माधव सुर्यवंशी आणि मोटार वाहन निरीक्षक श्री किरण पाटील व अनिस बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज