“चला बोलू करिअर वर” या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
अलिबाग,दि.30 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र रायगड-अलिबाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध मार्गदर्शनपर
सत्रे आयोजित करण्यात येतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य नोकरी कशी मिळवावी,
नोकरीसाठी अर्ज करताना कसा व कुठे करावा या सगळ्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या अनुषंगाने
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग यांच्या वतीने
“चला
बोलू करिअर वर” या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र दि.31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता
https://meet.google.com/sqr-ytej-cox,
या गुगल मिट प्लॅटफॉर्म वर आयोजित केले आहे.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांतर्गत या सत्रामध्ये ठाणे जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार आणि उद्योजकता कार्यालयाचे यंग प्रोफेशनल, श्री.आशुतोष साळी हे सहभागी उमेदवारांना
12 वी/पदवी नंतर कोणता मार्ग निवडावा?, स्व-परिचयपत्र (Resume, CV, Bio Data) कसा बनवावा?
मुलाखतीची तयारी कशी करावी? अशा नोकरीसंबधी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभागी
व्हावे व तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार
आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले
आहे.
००००००
Comments
Post a Comment