संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांतर्गत 50 टक्के अनुदान योजना,बीज भांडवल योजनेसाठी इच्छुकांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत
अलिबाग,दि.27(जिमाका) :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय रायगड यांच्यामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता राबविल्या जाणाऱ्या 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजनेसाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
महामंडळाच्या 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना या शासकीय योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर होलार व मोची इ.) असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून मूळ कागदपत्रांसह योजनेसाठीचे प्रस्ताव तीन प्रतीत मधुनील हाऊस नं.15 रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं.105 पारिजात सह.गृहनिर्माण संस्था मर्या. पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे ता.अलिबाग,जि.रायगड येथे स्वतः अर्जदाराने प्रस्ताव दाखल करावे.
कर्ज प्रस्तावासोबत अर्जदाराने जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, शैक्षणिक दाखला, आधारकार्ड/मतदान ओळखपत्र, छायाचित्र, कोटेशन, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परवाना/ बॅच, व्यवसायाकरिता जागेचा पुरावा लाईटबील टॅक्स पावती भाडे पावती करारपत्र इ., ग्रामपंचायत,नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, दोन सक्षम जामीनदार ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज दि. 11 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, रायगड, मधुनील हाऊस नं.15 रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं.105 पारिजात सह. गृहनिर्माणसंस्था मर्या.पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे ता. अलिबाग,जि. रायगड या ठिकाणी अर्ज वाटप तसेच कर्ज प्रस्ताव स्वतः प्रत्यक्ष अर्जदाराकडूनच स्विकारले जातील.
रायगड जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, रायगड यांनी केले आहे.
००००००००
Comments
Post a Comment