स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
अलिबाग,दि.1(जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग रायगड अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान, जितनगर अलिबाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवड्याची सुरुवात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून आणि अलिबाग शहरांमध्ये पाच किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेस (दि.30 जानेवारी 2023) हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला व स्पर्धा पूर्ण केली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री.भगवान जाधव, वैद्यकीय सहाय्यक श्री.राजकुमार गाजुलवार, निमवैद्यकीय कर्मचारी, कनिष्ठ लिपिक श्री.तेजस मोरे, श्री. शशिकांत शिर्के उपस्थित होते.
सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे यांनी सर्वांना कुष्ठरोगाबाबत माहिती देऊन जनजागृती केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्रक देण्यात आले आणि बँकेच्या पासबुक ची छायांकित प्रत कार्यालयात जमा करण्यास सुचविले, जेणेकरून विजेत्यांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करता येईल. या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, सचिव विशाल आढाव, माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग संपर्क प्रमुख ॲड. भूपेंद्र पाटील, अध्यक्ष ॲड. भूषण जंजिरकर, ॲड. रोशनी ठाकूर, ॲड.सुकन्या, प्रशांत पावरा, यतिराज पाटील, सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे, पोलीस पाटील श्री. विकास पाटील, डॉ.अनिकेत म्हात्रे, सचिन गोंधळी, रायगड जिल्हा क्रिकेट कार्याध्यक्ष जयंत नाईक इत्यादी मान्यवर यांचे ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
00000
Comments
Post a Comment