जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी फूटबॉल स्पर्धेत सहभागी व्हावे -- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक

 

 

अलिबाग,दि.1(जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न, म्युनिच, जर्मनी यांच्या मध्ये महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळाचा प्रचार विकास होण्यासाठी करार झाला आहे. त्या अंतर्गत शालेय 14 वर्षाखालील मुलांसाठी एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप राज्यस्तर फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या करारानुसार या स्पर्धेतून राज्यातून 20 खेळाडू  म्युनिच, जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत.

            या 20 खेळाडूंची क्रीडाराज्यस्तर स्पर्धेपूर्वी जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजयी संघ विभाग/राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल व हारलेल्या संघातून उत्कृष्ट 5 खेळाडू पुढीलस्तरावर निवड चाचणीसाठी निवडले जातील.

            जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि रायगड जिल्हा ॲमच्युर फुटबॉल असोशियशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर एफ.सी.बायर्न कप 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

वयोगट व जन्मदिनांक - 14 वर्ष मुले फक्त, जन्मतारीख दि. 01.01.2009 नंतर असावी. स्पर्धा दिनांक- दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2023, स्पर्धा स्थळ - कॉरवस अमेरिकन ॲकडमी, कर्जत मुरबाड रोड, वडवली ता. कर्जत. संपर्क - श्रीम. मनिषा मानकर - मो.बा.- 7020555329, श्री.सचिन निकम – 8856093608,श्री. किरण आंचन – 9022899933,श्री. अनिल जॉन – 6238608927, श्री. समिर रेवाळे – 9766235250.

या स्पर्धेकरिता शालेय क्रीडा स्पर्धेकरिता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज ( 20 खेळाडू)प्रवेश अर्जासोबतच खेळाडू आधार कार्ड, जन्म दाखला व बोनाफाईड जोडण्यात यावा. ही कागदपत्रे स्पर्धेच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, गणवेश इ. बाबी स्वत:सोबत आणाव्यात.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/8yT5WuBhYhnKiT947 या लिंकवर प्रवेश नोंदवावा व कार्यालयाच्या ईमेल वर दि.७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रवेशिका सादर कारावी. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी या  फूटबॉल स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक