अलिबाग तालुक्यातील ऑटोरिक्षा मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालकांनी वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेवून संघटना प्रतिनिधीमार्फत संपर्क साधावा


 

अलिबाग,दि.28(जिमाका):- सचिव, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या वाहनांच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरीता दि.31 मार्च 2023 पर्यंत शेवटची मुदतवाढ देणे तसेच भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टेरिफकार्ड दि.31 मार्च 2023 पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याकरीता प्राधिकरणाने परिचलन पद्धतीने मान्यता दिली आहे.

 या कार्यालयाच्या अंतर्गत MMRTA क्षेत्रात येणाऱ्या पेण व अलिबाग तालुक्यातील ऑटोरिक्षा व मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालक यांना मीटर रिकॅलिब्रेशनसाठी पेण येथे यावे लागत आहे. अलिबाग तालुक्यातील वाहन चालकांना पेण येथे येणे खर्चिक व गैरसोईचे आहे. त्याबाबत अलिबाग येथील ऑटोरिक्षा व्यवसायिक संघटनाद्वारे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील सर्व ऑटोरिक्षा, सर्व मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालक यांनी आपल्या वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आपल्या संघटना प्रतिनिधीमार्फत या कार्यालयाशी संपर्क साधून मीटर सिलिंगसाठी अलिबाग येथे ठराविक दिवस निश्चित करुन देता येईल. त्यामुळे आपली होणारी गैरसोय दूर करता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण महेश देवकाते यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज