संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील सूवर्णसंधी

 

अलिबाग,दि.1(जिमाका):- सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था (मुलींसाठी), नाशिक या शासकीय संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे.  या संस्थेतील प्रथम तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

यासाठी पात्रता- अविवाहित (मुलगी), महाराष्ट्र बेळगाव कारवार बिदर येथील मध्ये माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारी, जून-2023 मध्ये इयत्ता 11 वी प्रवेश घेण्यासाठी असावी.

शारीरिक पात्रता- सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या निकषांसाठी पात्र असावी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नॅशनल डिफेन्स ॲकडमी/नेव्हल ॲकडमीकरिता जे निकष आहेत ते असावेत.   जसे की, उंची 152 सें.मी., वजन 42.5 कि.ग्रा., रातांधळेपणा  किंवा रंगांधळेपणा नसावा, प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नॅशनल डिफेन्स ॲकडमी/नेव्हल ॲकडमीतील प्रवेशाकरिता जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी (eye power).

लेखी परीक्षा आणि मुलाखत उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी दि.09 एप्रिल 2023 रोजी साधारणतः इयत्ता  10 वीच्या बोर्ड सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रूपये 450/- येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे शुल्क जाणार प्रवेश अर्ज नसल्यास अर्ज नामंजूर परीक्षा शुल्क मिळणार नाही.  प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख दि.12 मार्च 2023 आणि वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यत.

सकाळी 10 नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील. स्वाक्षरीत /- मेजर (निवृत्त) शासकीय व खाजगी नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल तसेच इतर रोजगार.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक