कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री क्र.1077 व व्हाट्सअप क्र. 8275152363 जाहीर


 

अलिबाग,दि.2,(जिमाका):- जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

 मा.उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनहित याचिका 87/2006 मध्ये दि.17 सप्टेंबर 2018 रोजी आदेश पारीत केले होते. त्यानुषंगाने, शासन, महसूल व वन विभागाकडील दि. 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयान्वये सागरतटीय जिल्ह्याकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विभागीय स्तरावर तसेच जिल्हा/तालुका स्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्याबाबत निर्देश दिले होते.

त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील दि.03 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने व या कार्यालयाकडील दि.16 नोव्हेंबर 2018 च्या आदेशान्वये जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक