राष्ट्रीय नमुना पाहणी 76 वी फेरी सर्वेक्षण पाहणी विषयावर आधारित विशेष सेमिनारचे आयोजन


अलिबाग,दि.8(जिमाका):- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर राष्ट्रव्यापी सर्वेक्षणे घेण्यात येतात. अर्थ व सांख्यिकी संचालनालय या पाहणीमध्ये अनुरूप नमुना तत्वावर सहभागी होते. या सर्वेक्षणाचा उद्देश सामाजिक व आर्थिक बाबींवर माहिती संकलित करुन धोरणे तयार करण्यासाठी होतो. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवर आधारित निष्कर्ष/अहवाल संचालनालयामार्फत प्रसिध्द करण्यात येतात.

       त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीतील पिण्याचे पाणी, स्वछता, आरोग्य आणि घरांची स्थिती, दिव्यांग व्यक्तीची पाहणी या विषयांवर आधारित सेमिनार संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे.

    या सेमिनारमध्ये संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सांख्यिकी/अर्थशास्त्र संबंधित शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी/अध्यापक यांच्याकडून शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोधनिबंध सादर करणाऱ्या व्यक्‍तीस सादरीकरणासाठी बोलविण्यात येईल तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा)  76 वी फेरीच्या वरील विषयांवर आधारित शोधनिबंध तयार करुन dydimss.des@maharshtra.gov.in या ई-मेलवर दि.15 मार्च2023 पर्यंत पाठविण्यात यावेत. सेमिनार करिताचा दिनांक/स्थळ/वेळ आपणास यथावकाश कळविण्यात येईल, असे उपसंचालक, अर्थ व सांख्यिकी कार्यालय, रायगड-अलिबाग श्रीमती वृषाली माकर यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज