कातकरी उत्थान अभियान आणि सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले वाटप शिबिर संपन्न
अलिबाग,दि.24(जिमाका):- कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्जत उपविभागीय अधिकारी श्री.अजित नैराळे, खालापूर तहसिलदार श्री.अयुब तांबोळी यांच्या पुढाकाराने गुरुवार,दि.23 मार्च 2023 रोजी रानसई आदिवासी वाडी, ग्रुप ग्रामपंचायत शिरावली त. छत्तीशी ता.खालापूर येथे आदिवासी समाजातील बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यासाठी तहसिल कार्यालय खालापूर, परिवर्तन सामाजिक संस्था आणि उरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर संपन्न झाले.
यावेळी मंडळ अधिकारी श्री.तुषार कामत, तलाठी सजा वोवोशी श्री.माधव कावरखे व वावोशी मंडळातील सर्व तलाठी आणि कोतवाल यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये जवळपास 150 फॉर्म भरून घेण्यात आले. या शिबिराच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.महेश पाटील आणि सौ.प्रमिला पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराच्या आयोजनाबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी तसेच प्रा.राजेंद्र मढवी आणि रत्नाकर घरत यांनी महसूल विभागाचे विशेष आभार मानले.
०००००००
Comments
Post a Comment