जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.3,(जिमाका):-  मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार न्याय आपल्या दारी या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       या फिरते लोक अदालतीचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

      या कार्यक्रमास सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, अलिबाग, जिल्हा सरकारी वकील व अध्यक्ष वकील संघटना अलिबाग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

       हे फिरते न्यायालय रायगड जिल्ह्यामध्ये दि.7 एप्रिल 2023 पर्यंत कार्यरत असणार आहे व ते जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जावून लोकअदालत आयोजित करणार आहे.    या फिरत्या लोकअदालतीचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती एस. एस. सावंत यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक