“होय…आपण टी.बी.संपवू शकतो…!” जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नि:क्षय मित्रांचा होणार विशेष सत्कार


 

अलिबाग,दि.23 (जिमाका):- दरवर्षी दि.24 मार्च, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्य प्रशासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील जिल्हा क्षयरोग केंद्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा, माणुसकी प्रतिष्ठान, सुरभी स्वयंसेवी संस्था, आर.सी.एफ. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी शुक्रवार, दि.24 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, अलिबाग येथे सकाळी 11 वाजता जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर मुख्य कार्यक्रम तसेच नि:क्षय मित्रांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्षयरुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट चे वितरण करण्यात येणार आहे.

            या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, आर.सी.एफ.थळ चे कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

            तरी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान व सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज