आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या कामास सुरुवात

 


 

अलिबाग,दि.24(जिमाका):- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) आदर्श शाळा टप्पा 2 अंतर्गत मागील दोन दिवसात सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच्छापूर येथे 100 टक्के आदिवासीबहुल शाळेत किरकोळ दुरूस्ती व बोअरवेल पाईपलाईन शाळेपर्यंत आणण्याचे काम गावातील गावकऱ्यांकडून श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात येत असून हे गावाचे एकजूटीचे  प्रतिक आहे.

  या कामांसाठी जिल्हा परिषद रायगड-अलिबाग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक गण व शिक्षणाची जाणीव असणारी जागरूक शिक्षण समिती आणि  पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) जिल्हा समन्वयक श्री. रत्नशेखर गजभिये यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज