अलिबाग व तळा तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या योजनांची स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम
अलिबाग,दि.23 (जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची अलिबाग तालुक्यातील वावे-मल्याण, रामराज, तळा तालुक्यातील टोकार्डे, तळा बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.
या कलापथकाचे नेतृत्व किरण काशिनाथ साळवी करीत असून कलाकार म्हणून पूर्वशा गण, समीक्षा रेडीज, शिवानी मौर्य, रिया टोपले, हर्षदा होगाडे, निशांत नवाखरकर, समृद्धी पाटील, सानिका भगत आदी कलाकार सहभागी झाले असून पथनाट्य यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी वाहतूक नियंत्रक तळा बस स्थानक, रामराज येथील पोलीस पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पढवणचे सदस्य विठ्ठल सुतार, वावेचे पोलीस पाटील दिनेश राऊत यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या या लोक जागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment