भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “सलग 18 तास अभ्यासक्रम” उपक्रम संपन्न

 

 

अलिबाग,दि.19(जिमाका):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग-रायगड येथे सलग 18 तास अभ्यासक्रम उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या अधिकारांमुळेच सर्वसामान्य व्यक्तीदेखील  शासकीय उच्च पदावर पोहोचू शकतो. या महामानवाचा आपण सदैव आदर्श ठेवला पाहिजे व शैक्षणिक जीवनात मुलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराप्रमाणेच अभ्यास करायला पाहिजे, असा संदेश अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील यांनी यावेळी  दिला. 

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अंजन गायकवाड, डॉ.सुजाता चहांदे, डॉ.आडके, डॉ.घुगे, डॉ.विशाल उबाळे, डॉ. शिल्पा नारायणकर, डॉ.वागमोडे, डॉ.शिंदे, डॉ.कासले, डॉ.पवार, डॉ.नाझिया, डॉ.श्रुती पांडे, डॉ.पंकज कांबळे, डॉ.सौरभ पाटील, डॉ. कृष्णा बडगिरे, डॉ.राऊत, डॉ.मनीष, डॉ.अंकिता ताठे, डॉ.प्रियांका आंबेकर, डॉ.अदिती थळे, मयूर, सुबोध यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी दिली आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज