“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन कार्यशाळा संपन्न


 

अलिबाग,दि.19(जिमाका):- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समता पर्व दि.01 एप्रिल 2023 ते दि.02 मे 2023 या कालावधीत साजरा करण्याचे सामाजिक न्याय विभागाने ठरविले आहे. ‘सामाजिक समता पर्व' कार्यक्रमातंर्गत दि.18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहूरपाडा, ता.अलिबाग येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेश कार्यशाळा संपन्न झाली.

समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहूर पाडा, ता.अलिबाग येथे जिल्हा रुग्णालय, अलिबाग चे डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी 50 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये सर्वसाधारण, रक्त तपासणी, बी.पी., शुगर इ. तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच श्री सत्पाल लोणे, जनसेवा फाउंडेशन, पुणे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक जागृती, उपचार, वैद्यकीय सुविधा, आहार विषयक, निवारा केंद्रे, वृध्दाश्रम, डे केअर सेंटर, विरंगुळा केंद्र, मेडिटेशन, जेष्ठासंबंधी साधने इ.बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम करणारे संचालक, समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहूरपाडा, ॲड.श्री.गुंजाळ तसेच जनसेवा फाउंडेशन पुणे श्री.सत्पाल लोणे यांचाही सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आरोग्य तपासणीसाठी उपस्थित सर्व डॉक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयातून डॉ.बामणे, डॉ.आशिष धरणकर, डॉ.सार्थक देशमुख, डॉ.राही पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव, कार्यालय अधीक्षक श्रीम.माधुरी पाटील, गृहपाल श्री.संदिप कदम व समाज कल्याण निरीक्षक श्रीम.मंदाकिनी पाटील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज