गोशाळा अनुदानासाठी 19 जुलै पर्यंत अर्ज करावेत

 

 

अलिबाग,दि.29(जिमाका):-गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुक्यातून योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कर्जत तालुक्यातील लाभार्थ्यांना हा लाभ आधी मिळाला असून आता पनवेल, खालापूर, कर्जत, पेण, रोहा,पाली-सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या प्रत्येक तालुक्यातून एका गोशाळेसाठी अनुदान देण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि.19 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे यांनी केले आहे.

              इच्छुकांनी नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत, असेही त्यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत