जंजिरा सैनिकी विश्रामगृहातील सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा

 

 

अलिबाग,दि.23(जिमाका):- राज्यातील सर्व माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच राज्यातील/ जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता अलिबाग -गोंधळपाडा येथे ‘‘जंजिरा सैनिकी विश्रामगृह’’ कार्यरत आहे.  माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच इतर नागरीक यांना त्यांच्या सैन्यातील हुद्दयाप्रमाणे राहण्याचे दर आकारण्यात येतात.    

              विश्रामगृहामध्ये अतिमहनीय, वातानुकूलित तसेच डॉरमेट्री कक्ष तसेच खानपान सेवा वाजवी दरामध्ये उपलब्ध आहे. विश्रामगृहाच्या आवारात खुला हॉलदेखील उपलब्ध आहे. हा हॉल तसेच कक्ष मुलांचे वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरी, कार्यालयीन बैठका इत्यादीकरिता उपलब्ध राहतील.

      इच्छुक अभ्यागतांनी विश्रामगृहाच्या 9021273310, 9175062877  या मोबाईलवर संपर्क साधावा व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत