ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी "बँक ऑफ इंडिया" कटिबध्द --कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार
अलिबाग,दि.29 (जिमाका):-ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, शाखा अलिबाग कटिबध्द असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार यांनी येथे केले.
बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखेचे (दि.19 जून) रोजी नवीन जागेत स्थलांतर झाले असून त्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नॅशनल बँकिंग समूह पश्चिम विभागाचे महाप्रबंधक श्री.सुब्रतो कुमार रॉय, रायगड विभागाचे विभाग प्रमुख श्री. मुकेश कुमार, उपविभाग प्रमुख श्री.जॉन लोबो, अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, शाखाधिकारी सनी बर्नवाल, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्री. प्रदीप अपसुंदे तसेच विभागीय कार्यालयाचे पदाधिकारी आणि ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
यावेळी बोलताना सूब्रात कुमार म्हणाले की, बँकिग सुविधा सुधारण्याबरोबर कृषी, महिला बचतगट, छोटे-मोठे व्यवसाय यासाठी रायगड जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ इंडिया नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी सुध्दा ग्राहकांप्रती आमची समर्पक भावना अशीच राहणार आहे. “बँकेचे नाते बँकिंग पलीकडचे” या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन जागेतील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्राहकांबरोबर त्यांनी संवाद साधून बँकेकडून देण्यात येणाऱ्या लाभांविषयीची सविस्तर माहिती ग्राहकांना दिली.
00000000
Comments
Post a Comment