आदिवासी मुलांच्या नवीन पनवेल येथील शासकीय वसतिगृहाकरिता हवी भाडेतत्वावर इमारत

 

 

अलिबाग,दि.28(जिमाका) :- आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह पनवेल (नवीन), ता.पनवेल, जि.रायगड, येथे सुरु असून आता पनवेल परिसरामध्ये या वसतिगृहातील 100 विद्यार्थ्यांना पुरेशी अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत भाडेतत्वावर मिळणे आवश्यक आहे.

     तरी अशा प्रकारची सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारत उपलब्ध असल्यास संबंधितांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड (02143 252519)  व गृहप्रमुख, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, पनवेल (नवीन), ता.पनवेल जि.रायगड (श्री.सोळसकर- 8275929569) कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव  दि.5 जुलै, 2023 रोजीपर्यंत सादर करावा,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज