महाड येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु


 

अलिबाग,दि.28(जिमाका):- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड़, पंचशिल नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळ, ता. महाड येथे 100 मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे.

शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत आरक्षण अनुसूचित जाती 80 टक्के अनुसूचित जमाती 03 टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास 5 टक्के अनाथ- 3 टक्के, अपंग- 2 टक्के, असे आहे.

 प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4 हजार शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.500 निर्वाहभत्ता, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेष भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट/शैक्षणिक सहल भत्ता, अॅप्रन भत्ता ही वैशिष्ट्ये आहेत.

प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीच्या आणि अनु.जमातीच्या विद्यार्थ्याकरिता रु.2 लाख 50 हजार च्या आत असलेले तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखाच्या आत असलेले प्रमाणपत्र, अर्जासोबत संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, बँक खाते नोंदवहीची (पासबुक) झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स ही कागदपत्रे या वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक आहेत.

वसतिगृहात राहाणाऱ्या मुलाकरिता प्रवेश इ.08 वी पासून पुढे आणि मांग, मेहतर, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुलांकरिता इ.5 वी पासून प्रवेश देण्यात येतो. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, पंचशिल नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळ, ता. महाड जि. रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्री. अनिल मोरे, (मो.7507269014) यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक