पेण तहसिल कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) अभिनव पुढाकार घेतला असल्याने भारताला योगाचा संदेश आणि फायदे जगभरात पोहोचविण्यात मदत झाली आहे. अमृत सरोवराचा शांत परिसर व पवित्र वातावरण योग्य उत्साहींना एकत्र येण्यासाठी, विविध आसनांचा सराव करण्यासाठी व योगाच्या सर्वांगीण अभ्यासामध्ये मग्न होण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. म्हणूनच अमृत सरोवर अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या अमृत सरोवराच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याबाबत शासनाचे निर्दश प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने पेण तालुक्यातील मौजे कांदळेपाडा येथील अमृत सरोवर या ठिकाणी दि.21 जून 2023 रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये पेण उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार श्रीम. स्वप्नाली डोईफोडे, यांच्यासह योगप्रशिक्षक श्री. शेरमकर तसेच अन्य महिला प्रशिक्षक, ग्रामपंचायत कांदळेचे सरपंच व उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी व महसूल कर्मचारी यांनी मोठया संख्येनी सहभाग घेतला.

यावेळी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व व आसनाचे प्रकार याविषयीची माहिती सर्वांना देण्यात आली. याशिवाय तालुक्यातील डोलवी, वाशी, शिर्की व वढाव या गावामधील अमृत सरोवर येथे स्थानिक ग्रामस्थ व योगउत्साही यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज