“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील प्रतिक्षायादीमधील ज्येष्ठतेनुसार उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्र प्रदान
अलिबाग,दि.22(जिमाका):- राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनाकडून नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिक्षायादीमधील ज्येष्ठतेनुसार काही उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नुकतीच देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर विकास शाखा) श्री.शाम पोशट्टी यांच्या हस्ते माथेरान नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग वि.जा.अ.) या पदावर श्री.गोपाळ विष्णू चव्हाण, मुरुड नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग खुला) या पदावर श्री.संजय कृष्णा बामगुडे आणि महाड नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग खुला) या पदावर श्री.विशाल भाऊ नलावडे यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्र देण्यात आले.
या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत संबंधित उमेदवारांनी शासनाचे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर विकास शाखा) श्री.शाम पोशट्टी यांचे आभार मानले आहेत.
0000000
Comments
Post a Comment