मतदान केंद्र सुसुत्रीकरण, पुनर्रचनेबाबत 7 दिवसात सूचना, हरकती नोंदवाव्यात --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

रायगड दि.26 (जिमाका) : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यातील  एकूण 7 विधानसभा मतदारसंघांत राबविण्यात येत आहे. पूर्वपुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून  22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनादेखील करण्यात येत आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सूचना द्यावयाची असल्यास या कार्यालयास सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास पुढील 7 दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

     जिल्ह्यातील एकूण 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील 1500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. या  प्रस्तावातील बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या🌹 कार्यालयास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

    हे बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी परिशिष्ट-1 मध्ये दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,रायगड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच http://raigad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 याबाबत काही सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास 7 दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजुरीनंतर मतदान केंद्राची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज