जिल्ह्यातील 17 अमृत कलश दिल्लीकडे रवाना जिल्हाधिकारी डॉ.म्हसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून निरोप

 


 

रायगड(जिमाका),दि.26:-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात ‘माझी माती-माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे.दिल्ली येथे जिल्ह्यातील 17 अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा  देऊन निरोप देण्यात आला.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्ह्यातील 17 अमृत कलश समारंभ पूर्वक दिल्लीत पाठविण्यात आले याप्रसंगी दिल्ली येथे अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड,  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, नगरपालिका प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 जिल्ह्यात ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत गावा गावातील माती कलशामध्ये संकलित करण्यात आली. तालुकास्तरावर गावांमधून आलेल्या कलशातील माती एकत्र करण्यात येऊन तालुक्याचा एक प्रातिनिधिक कलश तयार करुन, तो कलश गुरुवारी (दि.26) मुंबईमार्गे दिल्लीला रवाना करण्यात आले आहेत. सदरचे अमृत कलश घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मार्गस्थ झाले आहेत.

1 ते 30 सप्टेंबर दरम्यान रायगड  जिल्ह्यात ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये पारंपरिक वेशभूषेत, वाजत गाजत अमृत कलशामध्ये माती व तांदूळ जमा करण्यात आले आहे. यांनतर हे अमृत कलश तालुकास्तरावर पाठविण्यात आले आहेत. तालुकास्तरावर गावांमधून आलेल्या कलशातील माती एकत्र येऊन तालुक्याचा एक प्रातिनिधिक कलश तयार करण्यात आला आहे. तसेच उर्वरित माती अमृत वाटिका तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

सर्व गावातील माती एकत्रित करून तालुकानिहाय तयार करण्यात आलेले 15 अमृत कलश तसेच पनवेल महानगरपालिकेचा 1 अमृत कलश आणि सर्व नगर पालिकातील 1 असे 17 अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांच्या सोबत गुरुवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून, दिल्ली येथे अमृत वाटिका आणि अमृत स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज