जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन-2023 पुस्तिकेचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते प्रकाशन



 

रायगड(जिमाका)दि.13 :- अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन' यांच्या निर्देशानुसार "जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन" हे प्रकाशन दरवर्षी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार सन-2022-23 या वर्षाकरिताची जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिका 'जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रायगड' कार्यालयामार्फत तयार करण्यात आली असून या पुस्तिकेचे  प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पन्न व शुल्क विभाग रविराज कोले, उपसंचालक,जिल्हा सांख्यिकी कार्यालय श्रीमती वृषाली माकर तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेत जिल्हास्तरीय विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्राच्या स्थितीबाबतची तालुकानिहाय सांख्यिकी आकडेवारी देण्यात आली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज