13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड


 

रायगड(जिमाका)दि.10:- राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 44 हजार 396 मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम मंगळवार, दि.13फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येणार असून या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी केले आहे.

 त्याकरिता 6 लाख अल्बेडॅझोल गोळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. 3 हजार 518 शाळा, 3 हजार 322 अंगणवाड्यांमधून अल्बेडॅझोल गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुधी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे. ज्या मुलामुलींना कोणत्याही कारणाने 13 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी मिळाली नाही तर, त्यांना 20 फेब्रुवारी रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. 1 वर्ष आतील बालकांना गोळी देण्यात येऊ नये, 1 वर्ष ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी देण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज