हापूस आंबा थेट विक्रीसाठी नोंदणीला 15 फेब्रुवारी पासून सुरुवात

 

 

रायगड,दि.21(जिमाका):- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम 2024 करीता आंबा उत्पादकांना आंबा विक्री करीता पुणे आणि राज्यातील/परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्या करीता आंबा उत्पादकांची नोंदणी दि.15 फेब्रुवारी 2024 पासून सुरु करण्यात आली आहे.

स्टॉल नोंदणी करीता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागिल 6 महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणा-या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे नावे रु.10,000/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ.कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.

 इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर,नाचणे,जि.रत्नागिरी (02352-299328) अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे, (7218350054) यांचेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे वतीने करण्यात येत आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज