नोंदणी व मुद्रांक विभागाची जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरु


 

रायगड,दि.27(जिमाका):-  नोंदणी व मुद्रांक विभागाचे रायगड जिल्यायातील सर्व नोंदणी कार्यालये मार्च अखेरच्या दि. 29 मार्च, दि.30 मार्च व दि.31 मार्च 2024 या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सूचना आहेत. 

 दि.1 एप्रिल 2024 पासून नवीन (सुधारित) बाजारमूल्य दर तक्ते लागू होत असतात. त्यामुळे  दस्त नोंदणीची वाढती संख्या विचारात घेता होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीकांत सोनवणे यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत